आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत अचानक सुरू झाली पॉर्न क्लिप, लोकप्रतिनीधींच्या समोर घडला हा धक्कादायक प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर(राजस्थान)- येथील सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीत अचंबीत करणारा प्रकार घडला आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका बैठकीत अचानक पॉर्न व्हिडीओ सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. विभागाच्या सचिव मुगधा सिंग यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु असताना हा प्रकार घडलाय. या प्रकारानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत 10 लोकप्रतिनिधी आणि 33 जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी उपस्थित होते. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू होताच पॉर्न क्लिप सुरू झाली. यानंतर मुगधा सिंग यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनेंची अंमलबजावणी याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिली. हा व्हिडीओ कुणी सुरू केला याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आली नाहीये. पण सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे मुगधा सिंग यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...