आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क : टीव्ही शो 'ये है मोहब्बतें', 'इश्क में मनजावां', 'लक्ष्मी स्टोरिज' अशा सीरिअयलमध्ये काम करत असलेल्या 53 वर्षांच्या अभिनेत्री सुधा चंद्रन फिल्म न मिळाल्यामुळे दुखी आहेत. मागच्या 13 वर्षांपासून त्या एका फिल्मसाठी वाट पाहत आहेत. त्या शेवटच्या 2006 मध्ये आलेली फिल्म 'मालामाल वीकली' मध्ये दिसल्या होत्या. अशातच सुधा यांनी एका मीडिया हाउसशी बातचीत केली आणि फिल्म मिळत नसल्यामुळे दुःख व्यक्त केले.
- इंटरव्यूमध्ये सुधा चंद्रन म्हणाल्या, 'मला माहित नाही की, 'मालामाल वीकली' नंतर मला फिल्म का ऑफर झाल्या नाहीत. खरे तर लोकांना फिल्म आणि माझे काम खूप आवडले होते.'
- सुधाने सांगितले, 'अनेकांना वाटते की, मी फिल्मच्या ऑफर रिजेक्ट केल्या. पण मी सांगू इच्छिते की, असे काहीही नाही. खरे हे आहे की, इंडस्ट्रीतुन मला ऑफरच मिळत नाहीयेत. मला कळत नाही की, प्रोड्यूसर-डायरेक्टर मला एप्रोच का करत नाहीयेत.'
- त्या म्हणाल्या, 'मी फिल्ममध्ये अनेक रोल्स असे पहाते जे मी करू शकते. म्लाझ्यासाठी हे खूप त्रासदायक आहे की, अनेक पद्धतीच्या फिल्म बनत आहेत पण मला कोणताच रोल ऑफर होत नाही.'।
16 व्या वर्षी झाला होता अपघात, गमावला एक पाय...
- सुधा चंद्रन या जेव्हा 16 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांचा उजवा पाय इतका जखमी झाला होता की, डॉक्टरांना पाय कापावा लागला. यांनतर त्यांना लाकडाचा पाय लावला गेला. मागच्या 37 वर्षांपासून सुधाजी लाकडी पायावर चालत आहेत. तरीही त्या खूप सुंदर डान्स करतात.
- सुधा यांनी 1986 मध्ये आलेली फिल्म 'नाचे मयूरी' ने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ही फिल्म सुधा यांच्या आयुष्यावर बनली होती. याव्यतिरिक्त त्यांनी 'थानेदार', 'पति परमेश्वर', 'कुर्बान', 'जान पहचान', 'निश्चय', 'शोला और शबनम', 'इंसाफ की देवी', 'अंजाम', 'हम आपके दिल में रहते हैं' अशा फिल्ममध्ये काम केले आहे. बॉलिवूडच्या व्यतिरिक्त सुधा यांनी साउथच्या फिल्ममधेही काम केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.