आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधीर मुनगंटीवारांचे सयाजी शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले- 'वृक्षलागवड थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाबाबत अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम केवळ नाटक असून, 5 कोटींचे वृक्ष लागवड हे एकप्रकारचे थोतांड आहे. तसेच वृक्ष लागवडीतून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचे वक्तव्य सयाजी यांनी केले होते. त्यावर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात वृक्ष लागवड ही फक्त वन विभागाद्वारे केली जात नाही, तर वन विभागाच्या पुढाकाराने आनंदवन, धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पंताजलीच्या माध्यमातून लाखो वृक्ष लावले जात आहे. यात पर्यावरणप्रेमी, एनजीओचाही सहभाग आहे. हे सर्व थोतांड आहे असे म्हणणाऱ्यांनी आधी याचा अभ्यास करावा आणि नंतर अशाप्रकारचे वक्तव्य करावे."

सयाजी शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनंगटीवार म्हणाले, "वृक्ष लागवड हे फक्त वन विभाग करत नाही. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यात वन आंदोलन सुरू झाले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन या सामाजिक संस्थेत ही वृक्ष लागवड केली जाते. हे नाटकं कसं असू शकतं ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यामातूनही लाखो वृक्ष लावले जातात. इतकेच नाही तर पर्यावरण प्रेमी, विविध सामाजिक संस्थाही पुढे येऊन वृक्ष लागवड करतात. म्हणजे हे काम फक्त 27 हजार वन कर्मचारी करत नाहीत." 
 
"काही लोक स्वत:च्या पदरचे पैसे टाकून वृक्ष लावतात. आर्मीचे इको बटालियन, औरंगबादेतील मिलिट्रीचे जवान या वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी झाले आहे. मग त्यांच्यावरही तुम्ही शंका उपस्थित करतात. म्हणजे आपण एकटे प्रामाणिक बाकी अर्धा कोटी महाराष्ट्राची जनता अप्रामाणिक हे आश्चर्यजनक आहे. सयाजी शिंदेकडे याबाबत काही जास्त माहिती असेल, तर त्यांच्याकडून ती घ्यावी असे मी वन विभागाला सांगितले आहे. जर यात काही चूक आढळली तर त्यासाठी चौकशी समितीची स्थापना करु," असेही मुनगंटीवर म्हणाले.

सयाजी शिंदेची प्रतिक्रीया
मुनंगटीवारांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना सयाजी शिंदे म्हणाले, "मला प्रत्यक्षात काही अनुभव आलेत म्हणून मी असे भाष्य केले. सरकार लागवड करत असलेली रोप चांगली नाहीत. आपल्याकडे जास्त प्रजाती असणे गरजेच आहे. मात्र ती उपलब्ध नाहीत. सरकारने स्वत: झाडs लावावी आणि जगवावी असे सांगितले आहे. मात्र हे खरचं शक्य आहे का? म्हणूनच मला वाटतं हे सरळ खोटं आहे", असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...