आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sudhir Sevekar Writes About Purushottam Bhapkar's Swavlamban Yojnanchi Upayukt Mahiti Book

स्वावलंबन योजनांची उपयुक्त माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पुरूषोत्तम भापकर हे महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासातलं प्रसिद्ध नाव. कायर्क्षम, लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले भापकर हे एक सृजनशील लेखकही आहेत.  युवकांसाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हा परिचय.

 

युवकांनो स्वावलंबी व्हा या पुस्तकात युवकांसाठी स्वयंरोजगार आणि स्वावलंबनासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या विविध खात्यांचे प्रयत्न आणि योजना यांची समग्र माहिती एकत्रितपणे आणि मोठ्या देखण्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. हे पुस्तक नुकतेच सेवानिवृत्त झालेले मराठवाडा विभागाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेले आहे. त्याचा भर प्रामुख्याने मराठवाडा विभागात चालू असलेल्या उद्याेजकता विकास, कौशल्य विकास कार्यक्रमांवर अधिक आहे. या संबंधातील केंद्र शासनाचे धोरण, स्कील इंडिया मोहिम, मेक इन इंडिया कार्यक्रम, स्टार्टअप इत्यादींचा उल्लेख करून लेखकाने महाराष्ट्र राज्य हे सगळे ध्येयधोरण आणि कार्यक्रम राबवून  त्याद्वारे २०२२ पर्यंत राज्यात साडेचार कोटी राेजगाआभिमुख प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी कसे प्रयत्नशील आहे, याची सविस्तर मांडणी केली आहे. त्यातही मराठवाडा विभागाविषयीची महत्त्वपूर्ण आकडेवारी त्यात मांडलेली आहे. ती प्रामुख्याने २०१३ मध्ये डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या मराठवाड्याच्या मागासलेपणाच्या आढावा अहवालावर आधारित आहे. 


विविध खाती, महामंडळे यांच्यामार्फत स्वयंरोजगारासाठीचे  व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. विविध योजनांतर्गत या प्रशिक्षणाचा कालावधी व तपशील यात फरक असतो. शासनाच्या २५ हून अधिक महामंडळे, खाती यांच्यामार्फत असे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. उद्याेग विभाग, कौशल्य विकास विभाग, व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र उद्याेजकता विकास केंद्र, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्यासह कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय, रेशीम िवकास इत्यादी संस्थांचे प्रशिक्षण कार्यक्रम, जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना, आदिवासी विकास प्रकल्प याशिवाय विविध महामंडळे, जसे अण्णासाहेब पाटील महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ इत्यादींमार्फत अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असते. 


या सर्वांची एकेठिकाणी माहिती व तपशील या पुस्तकाच्या रूपाने डॉ. भापकरांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यात लाभार्थींची पात्रता, अटी-शर्ती, नियम, कागदपत्रे, कालावधी, शुल्क इत्यादी मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले. प्रधानमंत्री मुद्रा योजना व अन्य योजनांचीही माहिती आहे. कोणकोणत्या व्यवसायासाठीचे प्रशिक्षण दिले जाती याची एक सविस्तर सूचीही दिली आहे. सविस्तर प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या सूचीवरून उमेदवार त्यांच्या व्यवसायांची निवड करू शकतात. पुस्तकात बरीच आकडेवारी आहे. ज्यामध्ये अनेकदा पुनरुक्ती आहे. स्वत: डॉ. भापकर हे राज्यातील एक कार्यक्षम, सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना विविध पुरस्कार मिळालेली आहे. शिवाय ते लेखक, कवी व सृजनशील, संवेदनशील नागरिकही आहे. प्रस्तुत पुस्तकामुळे स्वयंरोजगार, कौशल्यविकास याची सविस्तर व एकत्रित माहिती उपलब्ध झालेली आहे. राज्यातील सुशिक्षित युवा पिढीसाठी ती आवश्यक आहे. सद्य:स्थितीतील एक उपयुक्त प्रकाशन म्हणून एक वेगळे महत्त्व आहे.

--------------------------------------
> पुस्तकाचे नाव : युवकांनो स्वावलंबी व्हा 
> लेखक : डॉ. पुरुषोत्तम भापकर, भा.प्र.से.
> प्रकाशन : विलास फुटाणे, आदित्य प्रकाशन, औरंगाबाद
> पृष्ठसंख्या : १४८ {किमत : दोनशे रुपये