आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखान्यांना स्वस्तात कर्जासाठी 12,900 कोटी मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची क्षमता विकसित करण्यासाठी १२,९०० कोटी रुपयांचे स्वस्तातील कर्ज मिळणार आहे. यावर सरकार २,७९० कोटी रुपये व्याजावर अनुदान देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी यासह विविध २९ निर्णय घेतले आहेत. साखर कारखान्यांना शिरा आधारित डिस्टिलरीजची क्षमता वाढवण्यासाठीही २,६०० कोटी रुपयांचे स्वस्तातील कर्ज देण्यात येणार आहे. यावरील ५६५ कोटी रुपयांचा व्याज खर्च सरकार करणार आहे. 

सरकारने जून २०१८ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. आतापर्यंत १३,४०० कोटी रुपयांच्या स्वस्तातील कर्जासाठी अर्ज मिळाले आहेत. खाद्यान्न मंत्रालयाने ६,००० कोटी रुपयांच्या ११४ अर्जांना मंजुरी दिली आहे. जेटली यांनी सांगितले की, साखर कारखान्यासमोरील संकट पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. यातील सर्वाधिक साखर कारखाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील आहेत.  


वाहनांच्या बॅटरीसाठी योजना  : वाहनांची बॅटरी बनवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल मिशन ऑन ट्रान्स्फॉर्मेटिव्ह मोबिलिटी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना पाच वर्षे म्हणजे २०२४ पर्यंत असेल. या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...