Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | sugarcane juice drinking health benefits in summer

उ‌‌‌‌‌न्हाळ्यामध्ये रोज उ‌साचा रस प्य‌ायल्याने होतील हे खास आरोग्य लाभ

दिव्य मराठी | Update - May 08, 2019, 10:07 AM IST

उ‌‌‌‌‌न्हाळ्यामध्ये उ‌साचा रस तुम्हाला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतो. ताजा आणि स्वच्छ उसाचा रस असतो आरोग्यदायी. 

 • sugarcane juice drinking health benefits in summer

  उ‌‌‌‌‌न्हाळ्यामध्ये उ‌साचा रस तुम्हाला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतो. ताजा आणि स्वच्छ उसाचा रस असतो आरोग्यदायी.
  1. थकवा कमी करेल
  उसामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम, फायबर पुरेशा प्रमाणात असते. ज्यांना अशक्तपणा किंवा थकवा जास्त प्रमाणात जाणवतो त्यांनी हा रस प्यायल्यास आराम मिळू शकतो. एनर्जी ड्रिंक म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव होतो.


  2.काविळीपासून बचाव
  हा रस काविळीमुळे यकृताला प्रभावित करणाऱ्या बिलीरुबीन नावाच्या तत्त्वाला कमी करतो. त्यामुळे यकृत निरोगी राहते. हे शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते. त्यामुळे ताप आल्यावर हे प्यायल्यास आराम मिळतो.


  3.प्रतिकारशक्ती वाढवते
  सतत आजारी असणे, थकणे, थोड्या कामाने धाप लागणे आणि शरीरामध्ये वेदना होणे यासारखे त्रास होत असतील तर उसाचा रस प्यावा. ही सर्व लक्षणे कमी प्रतिकारशक्तीची आहेत. उसाच्या रसामुळे ऊर्जा मिळू शकते.


  4.पचनक्रियेसाठी चांगला :
  उसाच्या रसामध्ये पोटॅशियमची मात्रा जास्त असल्यामुळे हे पचनासाठी चांगले आहे. हा रस पचनक्रिया चांगली ठेवण्याबरोबरच पोटामध्ये संसर्ग होण्यापासून वाचवतो. बद्धकोष्ठ दूर करण्यासही मदत करतो.

Trending