आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड मुजराला अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवले, हिंगोलीतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील वडहिवरा येथे ४० वर्षीय ऊसतोड मजुराला अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळून जिवे मारण्‍याचा प्रयत्न करण्यात आल्‍याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र अद्याप याची पोलिसात नोंद झाली नसल्याने निश्चित माहिती मिळू शकली नाही.


पांडुरंग तुकाराम घोडके (४०) असे सदर ऊसतोड मजुराचे नाव आहे. सदर घटना ५ दिवसांपूर्वी माणकेश्वर जवळील रुपुर ता. औंढा नागनाथ येथे घडली असल्याची माहिती  पांडुरंग घोडके यांच्या नातेवाईकांनी दिली. घोडके यांच्‍यावर हिंगोलीत उपचार करून पुढील उपचारासाठी त्‍यांना नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. याबाबत हिंगोली किंवा परभणी जिह्यातील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पीडित व्यक्तीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात त्याने सविस्तर माहिती दिली आहे. 

रमेश राठोड, प्रभू राठोड आणि शिवराम प्रभू राठोड अशी आरोपींची नावे असल्याचे गंभीर जखमी अवस्‍थेत असलेल्‍या पांडुरंग घोडके यांनी सांगितले आहे. तर याबाबत आज (गुरूवारी) रात्री नांदेड येथील रुग्णालय पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचे पीडित पांडुरंग यांचे भाऊ मिलिंद घोडके यांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...