Home | International | Other Country | suggests girls to keep a spoon in undergarments

मुलींना अंडरगार्मेंटमध्ये चमचा ठेवण्याचा दिला सल्ला, कारण माहीत झाल्यावर तुम्ही व्हाल चकित

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 04:32 PM IST

याआधी ब्रिटनमध्ये अशा प्रकारची पद्धत स्विकारण्यात आली आहे.

  • suggests girls to keep a spoon in undergarments

    स्वीडन - मुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी चित्र-विचित्र उपाय करण्यात येत आहेत. पण हे उपाय भारतात नाहीये तर स्वीडन या देशात आहेत. स्वीडनच्या एका शहरात मुलींना अंडरगार्मेंटमध्ये चमचा लपविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामागचे कारण ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. स्वीडनच्या गुटेनबर्ग येथे मुलींना बळजबरीने लग्न आणि circumcision साठी दुसऱ्या देशात पाठवण्यात येत आहे.

    त्यामुळे येथील मुलींना त्यांच्या संरक्षणासाठी आपल्या अंडरगार्मेंटमध्ये चमचा ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे एअरपोर्ट चेकिंग दरम्यान मेटल डिटेक्टर त्यांना पकडेल. अशातच त्यांना चौकशी करण्यासाठी एका सीक्रेट खोलीत नेण्यात येईल. तेथे त्या अधिकाऱ्यांना सांगू शकतील की, त्यांना जबरदस्तीने बाहेरील देशात नेण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत गुटेनबर्ग एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांना खास निर्देश देण्यात आले आहेत.

    महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध काम करणाऱ्या एका महिला अधिकारीने एअरपोर्ट अधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा केली आहे. कटरीना इडगार्ड यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, अशा परिस्थितीत त्यांनी काय करावे. कटरीना इडगार्ड यांनी सांगितले की, मुलींकडे बळजबरीने देशातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी हा शेवटचा पर्याय असणार आहे.

    कटरीना इडगार्ड यांनी सांगितले की, गुटेनबर्ग व्यतिरिक्त इतर अनेक शहरांमध्ये महिलांसोबत अशाप्रकारच्या अत्याचाराचे प्रकरणं समोर आले आहेत. अशातच त्या सर्व संशयास्पद शहरांच्या विमानतळांवर याबाबत माहिती देणार आहे. सोबतच तेथील मुलींनाही अंडरगार्मेंटमध्ये चमचा ठेवण्याचा सल्ला दिला जाईल. याआधी ब्रिटनमध्ये मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अशा प्रकारची पद्धत स्विकारण्यात आली आहे. यामुळे अनेक निष्पाप मुलींना सुरक्षितरित्या वाचवण्यात यश आले आहे.

Trending