आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् नवं घर ‘रंगलं’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुहास सिरसाट, बीड   चार वर्षांपूर्वी मुंबईत नवीन घरात शिफ्ट झालो, तेव्हा आठ दिवसांवरच रंगपंचमी आली होती. मुंबईत आता नवीन, हक्काचे घर झाले. त्यात नवीन रंग, टेबल-खुर्च्या, फर्निचर सर्व काही नवीनच होते. त्यामुळे आता रंगपंचमीला रंग न खेळता तो दिवस नवीन घरातच थांबून घालवायचा,  रंग खेळायला घराच्या बाहेर पडायचंच नाही, असं आम्ही नवरा-बायकोने ठरवलं होतं. आम्ही दोघेही दुपारपर्यंत घरीच गप्पा मारत बसलो. आता दुपार झाली. कोणीच मित्र रंग खेळायला येणार नाहीत, असा अंदाज आम्ही बांधला. पण, काही वेळातच काही मित्र आले आणि त्यांनी दारावरची बेल वाजवली. दरवाजा उघडताच सगळे घरात घुसले आणि रंग खेळायला सुरुवात झाली. आम्हाला रंग लावताना त्यांनी साऱ्या घरात रंगच रंग केला. सोफा, भिंतींसह अगदी बेडरूमपर्यंत रंग गेला होता. सगळं घरच कलरफुल झालं होतं. पण, आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो. कारण रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा मान असतो आणि रंग लावणाऱ्यांना आपण तो दिला पाहिजे. हे सर्व होत असताना बायको माझ्याकडे पाहत होती. मित्र रंग खेळून निघून गेले खरे, पण घरात पसरलेले रंग आम्हाला दोघांना साफ करावे लागले. अगदी दोन दिवस आम्ही दोघे रंग साफ करत होतो, परंतु काही केल्या ते निघत नव्हते. तेव्हा मी मित्रांना नवीन घरातील पसरलेल्या रंगांचे फोटोही पाठवले. काय यार, नवीन घर रंगवले होते, त्यात पुन्हा रंगपंचमीच्या रंगाची भर पडली. त्यामुळे आठवणीतील ही रंगपंचमी ठरली. नव्या घरात पसरलेल्या रंगाकडे पाहून बायको माझ्याकडे पाहत होती आणि मी मात्र मान खाली घातली होती...

बातम्या आणखी आहेत...