आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Metoo: लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या सुहेल सेठ यांना टाटा सन्सने अखेर पदावरुन हटविले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मी टू प्रकरणात लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर टाटा सन्सने अखेर सुहेल सेठ यांना सल्लागार पदावरून हटविले आहे. तसेच सुहेल सेठ यांच्यासोबत केलेला करार देखील रद्द करण्‍याचा निर्णय घेतला आहे. टाटा सन्सने निवेदन जाहीर करून ही माहिती दिली आहे.

 

मॉडेल डिएंड्रा सोरेस, फिल्ममेकर नताशा राठौर आणि लेखिका इरा त्रिवेदीसह 6 महिलांनी सुहेलवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांनंतर टाटा कंपनी या प्रकरणाची चौकशी केली होती.

 

दिल्लीमध्ये एका फॅशन वीकनंतर पार्टीमध्ये सुहेलने आपल्यासोबत गैरवर्तवणूक केली होती, असा आरोप बिग बॉस कंटेस्टंट राहिलेली डिएंड्रा सोरेस हिने फेसबुक पोस्टद्वारे केला होता. 

त्याचबरोबर सुहेलने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप नताशाने केला होता.

बातम्या आणखी आहेत...