आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 Women Assault Allegations On 55 Year Old Celebrity Consultant Suhel Seth And Now He Gets Engaged 18 Year Younger Girlfriend Model

5 महिलांनी सेलिब्रिटी कंसल्टेंटवर लावले सेक्शुअल हरॅशमेंटचे आरोप, तरीही 18 वर्षे लहान गर्लफ्रेंडने केला साखरपुडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 55 वर्षांचा रायटर आणि सेलिब्रिटी कंसल्टेंट सुहेल सेठने आपली 37 वर्षांची गर्लफ्रेंड अँड मॉडल लक्ष्मी मेमनसोबत साखरपुडा केला आहे. दिल्लीमध्ये प्रायव्हेट सेरेमनीमध्ये लक्ष्मीसोबत साखरपुडा केल्यानंतर सोहेल तात्काळ विदेशात सुट्टयांसाठी गेला. सुहेल दिर्घकाळपासून लक्ष्मीला डेट करत होता. दोघांच्या वयामध्ये 18 वर्षांचे अंतर आहे. सुहेल सेठवर काही दिवसांपुर्वी 5 महिलांनी सेक्शुअल हरॅशमेंटचा आरोप लावला आहे. 


4 वर्षे चालले होते सुहेलचे पहिले लग्न 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहेल-लक्ष्मी याचवर्षी 25 डिसेंबरला लग्न करु शकतात. सुहेलने यापुर्वी 1989 मध्ये संध्यासोबत लग्न केले होते. पण त्यांचे नाते फक्त 4 वर्षे चालले. यानंतर दोघं वेगळे झाले. 
- तर लक्ष्मी मेननविषयी बोलायचे झाले तर ती  Pirelli कॅलेंडरमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय मॉडल होती. 2011 मध्ये तिला कॅलेंडरमध्ये जागा मिळाली होती. 
- लक्ष्मीचा पार्टनर प्रबुध्दा दासगुप्ताचे निधन झाले आहे. प्रबुध्दा पेश्याने फोटोग्राफर होता. सध्या लक्ष्मी गोव्यात राहते.

 

महिलांनी लावले सेक्शुअल हरॅशमेंटचे असे आरोप 
- नुकताच एक फिल्ममेकर आणि क्रिएटिव्ह प्रोड्यूसरने आरोप लावला की, सुहेलने खोटे बोलून तिला घरी बोलावले आणि तिच्यावर जबरदस्ती केली. ही महिला म्हणाली की, सुहेल सेठने जबरदस्ती केलेली प्रत्येक महिला समोर आली तर या महिलांची संख्या 1000 असेल. 
- नताश्जा राठोड नावाच्या एका महिलेने आरोप लावला आहे की, 55 वर्षांच्या सुहेलने तिला खोटे बोलून स्वतःच्या घरी बोलावून तिला जबरदस्ती Kiss केले आणि अश्लिल चाळे केले.
- मंदाकिनी गहलोत नावाच्या पत्रकारने सुहेलवर जबरदस्ती किस करण्याचा आरोप लावला आहे. तर एका 26 वर्षांच्या महिलेने सुहेलवर वादग्रस्त मॅसेज पाठवण्याचा आरोप लावला. 
- अजून एका महिलेने म्हटले की, ती 17 वर्षांची असताना सुहेन सेठ सेक्स आणि ऑनलाइन डेटिंगविषयी बोलला होता. तसेच जबरदस्ती तिच्या कमरेवर हात ठेवला होता. 
- या आरोपांनंतर सुहेलला टाटा ग्रुपने कंसल्टेंट पदावरुन बरखास्त केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...