आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुई धागा'चे स्पेशल प्रमोशन, लोगो तयार करणा-या लोकांची कथा सांगत आहेत अनुष्का-वरुण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अनुष्का शर्मा आणि वरुण धवनचा सुई धागा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्यापुर्वी अनुष्का आणि वरुण अनोख्या अंदाजात चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. देशातील वेगवेगळ्या आर्ट फॉर्म्समधून सुई धागाचा लोगो तयार करण्यात आला होता. आता दोघंही त्याच कलाकारांची कथा घेऊन येत आहेत. अनुष्काने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते गुजरातच्या पाबीबेनची कथा सांगत आहेत. 


पहिला व्हिडिओ गुजरातमधून 
या व्हिडिओमध्ये रॉबरी आर्ट फॉर्म आणि ते चालवत असलेल्या पाबीबेनची कथा सांगण्यात आली आहे. कच्छच्या या आर्ट फॉर्ममधून गावातील महिला स्वावलंबी बनल्या आहेत. यासोबतच पाबीबेनने आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून हे काम जगभरात प्रसिध्द केले. 
- चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ मेड इन इंडियाला पाठिंबा देतो. तर मेक इन इंडिया कॉन्सेप्टच्या माध्यमातून गुप्त कलाकांना शोधून काढत आहे. 


40 गावातून शोधून काढले होते कलाकार 
'सुई धागा - मेड इन इंडिया' च्या लोगोसाठी सुई धाग्याच्या माध्यमातून एम्ब्रॉयडरी करणा-या लोकांची शोध घेण्यात आला. देशातील विविध भागांमधील 40 गावांतून हे लोक घेण्यात आले. अखेर काश्मिर आर्ट फॉर्म फूल पत्ती, राजस्थान आर्ट फॉर्म आरी बंजारा गोटा पत्ती, असम आर्ट फॉर्म हँडलूम वर्क, तामिळनाडू आर्ट फॉर्म तोडा आणि पंजाब आर्ट फॉर्म फुलकारीच्या माध्यमातून सुई धागाचा लोगो तयार करण्यात आला. 

 

बातम्या आणखी आहेत...