आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sui Dhaga Trailer: वरुण-अनुष्काच्या \'सुई धागा - मेड इन इंडिया\'चा ट्रेलर रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: मेक इन इंडिया थीमवर आधारित चित्रपट 'सुई-धागा'चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि अनुष्का शर्मा देसी अवतारात दिसत आहेत. हा चित्रपट गांधी जयंती(2 ऑक्टोबर) च्या निमित्ताने 28 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाचे डायरेक्शन शरत कटारिया करत आहेत. 


या चित्रपटात एका नवरा-बायकोची कथा सांगण्यात आली आहे. जे स्वतःचा बिझनेस सुरु करतात. चित्रपटात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा नवरा-बायकोच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा ममता(अनुष्का) आणि मौजी(वरुण धवन) यांची आहे. मौजी हा लहान-मोठी नौकरी करत असतो, त्याला मालकाकडून अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागतो. तर ममता हाउसवाइफ आहे. 


ममता नव-याच्या अपमानामुळे खुप त्रासलेली असते. ती त्याला नोकरी सोडून स्वतःचे काम करण्याचा सल्ला देते. मौजी नोकरी सोडतो आणि शिलाईचा बिझनेस उघडतो. यामध्ये ममता त्याची मदत करते. 


पाहा ट्रेलर...

 

बातम्या आणखी आहेत...