आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पशुवैद्यकच्या कर्मचाऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न; कायम आस्थापनेवर नियुक्तीची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी (दि.एक) सकाळी अकराच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेत पेट्रोलची बाटलीही जप्त केली. महाविद्यालयाच्या कायम आस्थापनेवर नियुक्ती मिळावी या मागणीसाठी कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता.

 
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात पशुपरिचर म्हणून कार्यरत असलेले शेख शकील अहेमद शेख रहिम यांनी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे कायम आस्थापनेवर नियुक्ती मिळावी, अशी मागणी केली होती. या पदावर ज्येष्ठतेने कायम करण्याच्या कायद्यानुसार पूर्वलक्षी प्रभावाने सेवेत कायम करण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. या मागणीसाठी त्यांनी कुलसचिवांना आत्मदहनाचा इशाराही दिला होता. २० डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत २४ जुलै २०१५ पासून कृषी विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झाला होता. एक जानेवारी २०१९ पर्यंत सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासनही दिले होते. मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप शेख शकील यांनी केला आहे. मागील साडेतीन वर्षांपासून विद्यापीठ प्रशासन फक्त पाठपुरावा करीत असल्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नव्हता, असे श्री शेख शकील यांनी म्हटले. पूर्वनियोजित नोटिसीप्रमाणे शेख शकील यांनी मंगळवारी पेट्रोलची बाटली घेऊन महाविद्यालय गाठले. परंतु तत्पूर्वीच पोलिसांचा त्या ठिकाणी बंदोबस्त होता. त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात आले.