आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयात दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न, दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली पण संरक्षक जाळीमुळे वाचला जीव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्या प्रकरण सुरू झाले आहे. दोन शिक्षांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने मंत्रालयात संरक्षक जाळी लावली आहे, त्यामुळे दोन्ही शिक्षकांचे जीव वाचले आहेत.दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयात आलेल्या दोन शिक्षकांनी आज आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. संरक्षक जाळीमुळे दोघेही सुरक्षित आहेत. दरम्यान, दोघांनी अचानक उडी मारल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी ताबडतोब धाव घेत दोघांनी संरक्षक जाळीवरून उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी आंदोलकांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...