आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या दुःखांने टेंशनमध्ये असलेल्या वडिलांनी बाथरुममध्ये दिला जीव, सुसाइड नोटमध्ये लिहिले कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटियाला(पंजाब): सासरी मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. याची सुनावणी शुक्रवारी ठाणा वुमन सेलमध्ये झाली. सासरच्या पक्षातील लोकांनी कोणतीही गोष्ट मान्य करण्यास किंवा ऐकण्यास नकार दिला. यामुळे टेंशनमध्ये आलेल्या रेल्वे डीएमडब्य्यूमध्ये ग्रेड-1 टेक्नीशियन जगरुप सिंह यांनी रविवारी दुपारी बाथरुममध्ये आत्महत्या केली. अर्बन एस्टेट फेज-2 निवासी 52 वर्षीय जगरुप यांनी कागदावर आत्महत्येचे कारण लिहिले आहे. पोलिसांनी मुलगी निकिताची तक्रार नोंदवली आहे. माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी निकितावर आरोप लावणे सुरु केले होते. हे प्रकरण संपले नाही तोच याची तक्रार वुमन सेलला देण्यात आली. 


सुसाइड नोट... रेल्वेच्या ग्रेड-1 डेक्नीशियनने 2 वर्षांपुर्वीच करुन दिले लग्न 
- रविवारी दुपारी जवळपास 12 वाजता जगरुप यांच्या घरातून काम करणारी मोलकरीन गेली. 12.30 वाजता त्यांनी मुलगी निकिता आणि पत्नीला बाजारात सामान आणण्यासाठी पाठवले. दोघी सामान आणण्यासाठी बाजारात गेल्या. जगरुपने गेट बंद केले आणि शेजा-यांशी थोडे बोलले. जवळपास 2 वाजता आई-लेक घरी परतल्या, त्यांनी गेट उघडण्यासाठी बेल वाजवली. वडिलांनी दार उघडले नाही. अनेक वेळा असे केले तरीही दार उघडले नाही. त्यामुळे त्यांना वाटले की, ते झोपले आहे. यांनंतर गेट तोडून दरवाजा उघडला. 
- आई-लेकीने घरात प्रवेश करताच जगरुप सिंह यांच्या बेडरुममध्ये जाऊन पाहिले, ते तिथे नव्हते. घरात सगळीकडे शोधल्यानंतर त्यांचे लक्ष बाथरुमकडे गेले. तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. यानंतर पोलिसांना सुचना देण्यात आल्या. जगरुप यांना पहिले हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 
- जगरुप यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले - माझ्या आत्महत्येमागे मुलीच्या सासरच्या मंडळीमधील 4 लोक आहेत. त्यांनी माझ्या कुटूंबाला त्रास दिला आहे. मुलीला फिजिकली आणि मेंटली टॉर्चर केले आहे. यामध्ये पती नीरज यादव, दिर तरुण, सासु स्नेह लता आणि सासरा हरपाल यादवर यांचा उल्लेख आहे. हे चौघेही त्यांच्या मुलीसोबत वाईट व्यवहार करत होते. 

 

पती सुट्टीवर यायया तेव्हा मारहाण करायचा 
निकिताने सांगितले की, गुरुग्राम निवासी नीरज, हा सैन्यात कॅप्टन आहे. त्याच्यासोबत नोव्हेंबर 2016 मध्ये माझा विवाह झाला. सध्या पती आसाममध्ये आहेत. पतीच्या अनुपस्थितीत सासु-सासरे, दिर खुप त्रास देत होते. नवरा सुट्टीवर यायचा तेव्हा तोही कुटूंबांचे ऐकूण मला त्रास द्यायचा. नशा करुन मला मारहाण करायचा. निकिताने वडिलांना याविषयी सांगितले तेव्हा ते हैराण झाले. त्यांनी सासरच्या मंडळीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी ऐकले नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...