Nagur / विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या

आंब्याच्या झाडाला लटकलेले होते मृतदेह
 

वृत्तसंस्था

May 17,2019 11:04:00 AM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यात प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सोमुवेल सुदाम गावित (३४) व सपना नीलेश गावित (३२) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. दोघेही विवाहित होते. समाज आपल्या प्रेमाला मान्यता देणार नाही या भीतीतून त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सपनाला तीन वर्षाची मुलगी असून सोमूवेलची पत्नी सुमाबाई गर्भवती आहे.


नवापूर तालुक्यात डाबरीफळी, तिळासर या गावातील सोमुवेल सुदाम गावित हा विवाहित होता. त्याचे नानगीपाडा गावातील सपना नीलेश गावित हिच्याशी प्रेमसबंध होते. त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ मे रोजी दोघे नाशिक येथे पळून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी सोमुवेल गावित याने वडील सुदाम गावित यांना फोनवरून सपना गावित हिच्याशी असलेल्या प्रेमसबंधाची माहिती दिली. त्यानंतर सुदाम याच्या वडिलांनी केलेल्या आग्रहास्तव दोघेही रात्री गावी आले. दोघांनी सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर रात्री सर्वजण जेवण करून झोपले. पहाटे चार वाजेच्या सुमारास सपनाची तीन वर्षाची लहान मुलगी रडत होती. तिचे रडणे थांबत नसल्याने सुदाम गावित उठले. या वेळी त्यांना सोमूवेल व सपना दोघेही अंथरुणावर नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी नाेंद केली असून तपास सुरू आहे.

X
COMMENT