आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालम येथील डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी -   पालम येथील एका तरुण डॉक्टरने शुक्रवारी (दि.२३) सकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या हॉस्पिटलमधील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. रवींद्र रेडगे असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येच्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही. मुळचे ताडकळस (ता. पूर्णा) येथील रहिवासी डॉ. रवींद्र रेडगे पालम शहराच्या मध्यवर्ती भागात बारा वर्षांपासून आश्विनी क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय करतात.

 

त्यांची सेवा ही अत्यंत उत्कृष्ट अाहे. ते दवाखानाही रुग्ण सेवेसाठी २४ तास चालू ठेवतात. गुरुवारी मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर पहाटे साडेसातच्या सुमारास रुग्णालयातील एका खोलीमध्ये त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. त्यांच्या आत्महत्येच्या मागील कारण समजू शकले नाही.  त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी येथे आणला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...