आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजाजनगरात स्पर्धा परीक्षेला सतत अपयश येत असल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- स्पर्धा परीक्षेला सतत अपयश येत असल्याने बजाजनगर येथील आकाश हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने गळ्याला जखम करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, १ जानेवारी रोजी घडली. सुनील शंकर परदेशी असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून सुनील परदेशी हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अनेकदा परीक्षेत अपयश आल्याने तो नेहमी चिंतेत असायचा.

 

मात्र, काही दिवस काम करून त्याने पुन्हा स्पर्धा परीक्षा देणे चालू केले होते. सुनील सतत तणावात असल्याने घरच्यांनी सुनीलचे समुपदेशन केले होते. गेल्या तीन वर्षांपासून सुनील समुपदेशनाच्या थेरपी करत होता. मात्र, तरीही सुनीलच्या मनात काय चाललंय हे घरातील कुणालाच काही कळत नव्हते. त्यामुळे घरातील आई, भाऊ यांनी त्याला संपूर्णपणे मनाप्रमाणे राहण्याची मुभा दिली होती, अशी माहिती सुनीलचे मोठे भाऊ अनिल परदेशी यांनी दिली. तरीही सुनील तणावपूर्ण राहत असल्याने मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुनील परदेशी याने राहत्या घरी अज्ञात वस्तूने गळ्याला जखम करून घेतली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. सुनीलला उपचारासाठी घाटीत हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.