आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीचा लग्नासाठी तगादा; युवकाने संपवली जीनवयात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील गोपालनगर भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाची एका युवतीसोबत ओळख होती. मागील काही महिन्यांपासून हा युवक बडनेरात राहत होता. दरम्यान, त्या युवकाने शुक्रवारी (दि. १२) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीने लग्नासाठी तगादा लावल्यामुळेच मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार युवकाच्या वडिलांनी बडनेरा पोलिसात केली. तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी युवकाची ओळख असलेल्या दाखल केला आहे. 

 

शुभम मोतीराम वाकोडे (२० रा. गोपालनगर ह. मु. अंजु कॉलनी, नवीवस्ती बडनेरा) असे मृ़तक युवकाचे नाव आहे. शुभमची एका २७ वर्षीय युवतीसोबत काही महिन्यांपासून मैत्री होती. बडनेरातील अंजू कॉलनीमध्ये शुभम भाड्याने खोली करुन राहत होता. ही युवतीसुद्धा बडनेरातच राहत असल्याचे बडनेरा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी (दि. १२) उशिरा रात्री शुभमने अंजु कॉलनीतील भाड्याच्या खोलीतच गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब शनिवारी सकाळी उघड झाली. शुभम ऑटो चालवून उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान, शुभमला संबंधित युवतीनेच वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावला, तिने अनेकदा शुभमला धमक्यासुद्धा दिल्या होत्या. त्यामुळे त्याचे जीवन जगणे असह्य झाल्यामुळे शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला लग्नाचा तगादा लावणारी ती युवती जबाबदार असल्याचा आरोप शुभमच्या वडिलांनी पेालिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी त्या युवतीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. 

 

सखोल तपास करणार 
मृतक युवक व गुन्हा दाखल करण्यात आलेली युवती यांच्यात मैत्री होती. मागील काही महिन्यांपासून बडनेरात ते भाड्याच्या खोलीत राहत होते. मृतकाच्या वडीलाने दिलेल्या तक्रारीवरून युवतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे. शरद कुलकर्णी, ठाणेदार, बडनेरा. 

बातम्या आणखी आहेत...