आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळसखेडा येथील 24 वर्षीय तरुणाची विष घेऊन आत्महत्या; जानेवारीत होणार होते लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फर्दापूर- पळसखेडा येथील २४ वर्षीय तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे येत्या जानेवारी महिन्यातच त्याचे लग्न होणार होते. सदर घटनेची पहूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

पळसखेडा येथील सागर संजय सावळे (२४) याच्या वडिलांची पळसखेडा शिवारात पाच एकर जमीन आहे. त्यावरच सावळे कुटुंबाची उपजीविका भागते. सागरने शनिवारी रात्री १२. ३० वाजेच्या दरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. सागरच्या वडिलाच्या नावावर कर्ज होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. सागरचे जानेवारीत लग्न होणार होते. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही. या घटनेची पहूर पोलिस ठाण्यात नोंद करून पुढील कार्यवाहीसाठी फर्दापूर पोलिस ठाण्यात वर्ग केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...