आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक तणावातून 19 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या; वडील म्हणाले, ती असा टोकाचा निर्णय घेऊच शकत नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वालियर- बटालियन परिसरात एका तरुणीने मानसिक तणावातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुजा (वय19) असे मृत तरुणीचे नाव आहे. कुटुंबियांनी सांगितल्यानुसार एक महिन्याआधी बीकॉमच्या परिक्षेत मृत पुजाचा एक पेपर राहिला होता. त्या तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.  

 

चहा घेऊन आई मुलीच्या खोलीत गेली तेव्हा समोर आला प्रकार
पोलिसांनी सांगितल्यानुसार, नेहमीप्रमाणे मृत पुजाची आई तिच्या खोलीत चहा घेऊन गेली होती. तेव्हा तिची खोली आतून बंद होती. त्यानंतर मृत पुजाच्या आईने खोलीत डोकावून पाहिले तेव्हा पुजा फासावर लटकलेल्या असवस्थेत आढळून आली. 

 

वडिलांनी सांगितले, रात्री असे काहीच नव्हते झाले जेणकरुन ती असा टोकाचा निर्णय घेईल 
मृत पुजाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, महिनाभराआधी झालेल्या बिकॉमच्या परिक्षेत मृत पुजाचा एक पेपर राहिला होता. तेव्हापासून ती मानसिक तणावाखाली वावरत होती. तिच्या वडिलांनी तिला अनेकदा समवजण्याचा प्रयत्न केला होता. त्याशिवाय एक रात्र आधीही असे काहीच नव्हते झाले जेणकरुन ती असा टोकाचा निर्णय घेईल. 

 

पोलिस याप्रकरणी तपास करणार असून लवकरच पुजाच्या आत्महत्येमागचे खरे कारण शोधणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...