आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवरामनगरात मुलास खेळण्यासाठी पाठवून घरात आईने घेतला गळफास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील शिवरामनगरात ३० वर्षीय विवाहितेने शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

 

चंद्ररेखा मनोज चौधरी (वय ३०) असे त्या महिलेचे नाव आहे. पती मनोज चौधरी, मुले कपिल व ओजस यांच्यासोबत चंद्ररेखा राहत होत्या. चौधरी दाम्पत्य हे मूळचे नेरीचे आहेत. ते सध्या जळगावच्या शिवरामनगरात राहतात. चौधरी यांना नेरी येथील त्यांच्या सुपर शॉपीत शेंगदाणे पाठवायचे होते. त्यामुळे ते शेंगदाणे खरेदीासाठी दाणा बाजारात गेले होते. मोठा मुलगा कपिल शाळेत गेला होता. चंद्ररेखा व लहान मुलगा ओजस घरी होते. दुपारी ओजस याला त्यांनी खेळण्यासाठी बाहेर जा, असे सांगितले. मुलगा सायकल घेऊन खेळायला गेला. दुपारी १२.३० वाजता त्यांनी घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ओजस घरी परतल्यावर दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला पण ताे उघडत नसल्याने शेजारी गोळा झाले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाइकांनी दुपारी १ वाजता त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.