आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तीनजणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. २७) पहाटे सहाच्या सुमारास कुंभेज येथे ही घटना घडली. मनीषा दत्तात्रय नागटिळक (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ भूषण मोहिते यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या चारजणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पती दतात्रय नागटिळक, सासू भाग्यरथी दतात्रय नागटिळक, दीर रणजित नागनाथ नागटिळक, मावस सासू फुलाबाई यांचा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांत समावेश आहे. पती, सासू व दीर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांना माहिती न देता मनीषा हीचे प्रेत परस्पर खाली उतरवून पुरावा नष्ट केला. तिने आत्महत्या केली नाही. संशयितांनी तिची हत्या करून आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. मनीषा हिच्या माहेरच्या हळंदुगे (ता.बार्शी) येथील नातलगांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. पोलिस उपनिरीक्षक भारती वाठोरे यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. यावेळी सासू, पतीला धक्काबुकी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. वाठोरे यांनी जमावाला शांत करुन संशयितांना अटक केली. मनीषा यांना दोन मुले अाहेत. भूषण मोहिते यांनी उसनवारी करुन बहिणीचे लग्न केले होते. एक मे २००९ रोजी रोजी मनीषाचे लग्न झाले. सासरची मंडळी तिला मारहाण करत होती. दोनदा सीना नदीपात्रात टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही तिच्या भावाने केला आहे.

 

इन कॅमेरा शवविच्छेदन
दुपारी दोन वाजता मनीषा हिचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. तिचा खून झाल्याचा आरोप करत तिच्या माहेरच्या मंडळींनी सोलापुरात इनकॅमेला शवविच्छेदनाची मागणी लावून धरली. त्यानुसार पाच वाजता मृतदेह सोलापूरला हलवले. शुक्रवारी सकाळी आठ वाजता शवविच्छेदन होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...