आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या झळा; अकोल्यात दांपत्याची, बुलडाणा-नंदुरबारमध्ये दोघांची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून शनिवारी सकाळी ११च्या सुमारास आत्महत्या केली. शेख उमर शेख मन्नान (४७) आणि नजरुन बी शेख उमर (४३) अशी दाम्पत्याची नावे आहेत. शेख उमर हे अडीच एकर शेतीवर तीन मुलांचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्यावर खासगी सावकारांचे व जिल्हा बँकेचे कर्ज होते. 

 

बुलडाण्यात दोन आत्महत्या : 
सुलतानपूर । भीमराव फकिरा इंगळे या शेतमजुराचा मुलगा वैभव भीमराव इंगळे (२३) याने सुलतानपूर शिवारातील पं. स. सदस्य डॉ. हेमराज लाहोटी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

 

धाड । मौंढाळा येथील अल्पभूधारक शेतकरी जनार्दन भिका खरात (५३) यांनी शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विविध बँका, सोसायटीचे त्यांच्यावर सुमारे ५ लाख रुपये कर्ज होते. 

 

नंदुरबारमध्ये तरुण शेतकऱ्याचा गळफास 
नंदुरबार | सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गौरव रामसिंग गिरासे (२५) या तरुण शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरव याने यंदा कापूस पेरला होता. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने हातातले पीक गेले. वडिलांनी सोसायटीकडून कर्ज काढले होते. तसेच बँक व इतरांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. 

बातम्या आणखी आहेत...