आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५५ वर्षीय लसूण व्यापाऱ्याची गोदामात गळफास लावून आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर- शहरातील मुकुंद नगरातील एका ५५ वर्षीय लसूण व्यापाऱ्याने गोडावूनमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ३ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नारायण रामदास सरोदे (वय ५५ रा.मुकुंद नगर) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

 

नारायण सरोदे हे लसणाचे व्यापारी म्हणून शहरात प्रसिद्ध होते. आज गुरुवारी सकाळी सहा वाजता दारात चपला दिसल्या परंतु घरात पती नसल्यामुळे पत्नीने शेजारच्या मुलगी मानलेल्या दुर्गा गणेश भोंबे यांच्या कानावर हा विषय घातला. त्यांनी तत्काळ मोबाइलवर संपर्क साधला. मात्र,कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी दारात येवून परत काॅल केला असता घराशेजारी गोडावूनमध्ये मोबाइल वाजला.त्यामुळे दुर्गा भोंबे यांनी गोडावूनकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना रामदास सरोदे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा केला असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.