आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण येथे राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने जळून महिलेचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- पैठण तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील नाथ निकेतन काॅलनी येथील चंदा प्रवीण शीलवंत (४०) या महिलेचा रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने जळून मृत्यू झाला. 

 

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, जमादार सोमनाथ जाधव, तुकाराम मारकळ ह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला तत्काळ पैठण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पती प्रवीण गुलाब शीलवंत याच्या माहितीवरून पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...