आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल तालुक्यात एका तरुणासह एका इसमाची आत्महत्या, दोघांनी गळफास घेऊन दिला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तालुक्यातील दहिगाव येथे राहत्या घरात एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडीस आली मयतचे नाव अक्षय धनराज महाजन (वय 20) असे आहे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.


दहिगाव ता यावल येथील महाजन गल्लीतील रहिवासी अक्षय धनराज महाजन (वय 20) हा शनिवारी घरात एकटा होता त्याचे कुटुंबीय दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना स्वयंपाकघरात छताला दोर बांधून तो गळफास घेऊन  मृतावस्थेत आढळून आला तेव्हा कुटुंबात कुठलाच ताण तणाव नसताना त्याने आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही. याबाबत यावर पोलिसात खबर गौरव किशोर महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षयच्या पश्चात आई-वडील, आजी, मोठे काका, भाऊ असा परिवार आहे. तो पंचायत समितीच्या माजी सभापती संध्या महाजन व भाजपाचे किशोर महाजन यांचा तो पुतण्या होता. सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील तपास शेखर तडवी करीत आहे. 


इसमानेही घेतला गळफास
याशिवाय सावखेडासीम शिवारात नागादेवी गावठाणात राहणाऱ्या गुरलाल महारू बारेला (वय ३८) याचा वनविभागाच्या रोपवाटिकेच्या मागील भागाला सातपुड्याच्या वनात बोरीच्या झाडाला साडीने गळफास घेतलेल्या मृतावस्थेत त्याचा मृतदेह आढळला.याबाबतची खबर पोलीस पाटील नरसिंग बारेला यांनी यावर पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कॉन्स्टेबल  सिकंदर तडवी व सहकारी करीत आहे. त्याने देखील आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही

बातम्या आणखी आहेत...