आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्येची फाइल उघडली अन्...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मेहेर कॉलनी म्हणजे शहरापासून काही अंतरावरील नवमध्यमवर्गाची वसाहत. खासगी कंपन्यांतील काही अधिकाऱ्यांनी सोसायटी करत घरे बांधली होती. त्यात पाच-सहा भूखंड रिकामे राहिले. महिला आर्थिक विकास महामंडळातील कारकून अनिल यांना याची कुणकुण लागली. त्यांनी वसाहतीच्या एका कोपऱ्याला असलेला भूखंड खरेदी केला. आणि वर्षभरात दोन मजली टुमदार घर बांधले. एक मुलगा, दोन मुली आणि पत्नी असा त्यांचा कुटुंब विस्तार होता. काळ जसजसा पुढे सरकत गेला तशी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी शहरापासून दूर वाटणारी मेहेर कॉलनी आता चांगली मध्यम भागात आली होती. गजबजली होती. घर बांधताना वयाच्या पंचविशीत असलेले अनिल आता पन्नाशीच्या घरात पोहोचले होते. नोकरीत वरच्या कमाईचे तंत्र त्यांना अवगत झाले होते. कर्ज प्रकरणाच्या फाइलचे वजन अनिल यांच्या खिशात पडत होते. त्यामुळे हळूहळू जास्तीचा पैसा घरात येत होता. त्याला अनिल यांच्या पत्नीने विरोध करून पाहिला. मोठ्या होत चाललेल्या मुला-मुलींनीही नाराजी व्यक्त केली. पण एकेकाळी प्रचंड गरिबी पाहिलेल्या अनिल यांना त्यांचे म्हणणे मान्यच नव्हते. मुलींच्या लग्नाला, मुलाच्या शिक्षणाला पैसा लागणारच, असा युक्तिवाद त्यांनी केला. कार्यालयातील त्यांचे सहकारीही याच मार्गाचे होते. त्यातून मग पार्ट्या सुरू झाल्या. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शेती खरेदी केली. तिथून घराची चक्रे उलटी फिरू लागली. बाजूचा शेतमालक सारखा कटकटी करू लागला. शेतात वहिवाटीसाठी रस्ता देण्यावरून एकदा भांडण इतके विकोपाला गेले की अनिल यांना जबर मारहाण झाली. पत्नीने शेत विकण्याचा सल्ला दिल्यावर त्यांनी प्रयत्न केला. एकाने नऊ लाख रुपये कबूल करून तीन लाख रुपयेच टिकवले आणि शेतात घुसखोरी केली. त्याच्याशीही अनिल यांची तुफान हाणामारी झाली. दोन्ही प्रकरणे पोलिसांत गेली. वरकमाईचा पैसा वाढत असला तरी साहेबांशी, सहकाऱ्यांशी वाट्यावरून तंटे होऊ लागले होते. कार्यालयीन बढतीचे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. मुलगा प्रताप खासगी कंपनीत नोकरीला लागला. त्याचे दोनाचे चार हात झाले असले तरी तो बापापासून तुटल्यासारखा होता. आठवड्यातून एकदा तरी त्याच्याशी अनिल यांचे कडाक्याचे भांडण व्हायचेच. मुलीही नीट बोलत-वागत नव्हत्या. एवढ्या सगळ्या ताणात एक हक्काचा नवा विरंगुळा त्यांना होता. तो म्हणजे समोरच्या घरात राहण्यास आलेली सरिता. तिचा नवरा अपंग होऊन अंथरुणाला खिळला होता. एका मुलीची आई, पस्तीशीत असलेली सरिता एका कंपनीत काम करत होती. घरापासून तुटलेले, खूप पैसा असलेले अनिल आणि पतीच्या अपंगपणाने एकटी पडलेली सरिता यांचे सूत जुळले होते. ते लक्षात आल्यावर अनिल यांच्या पत्नीने आकांडतांडव केले. पण नंतर त्या दोन मुलींचे शिक्षण, प्रतापचा संसार यातच मन गुंतवू लागल्या होत्या. सूनबाई बाळंतपणासाठी माहेरी गेल्यावर त्या नातवाच्या आगमनाची वाट पाहत होत्या. अचानक एक दिवस सकाळी त्यांची मुलगी वरच्या मजल्यावरून आरडाओरड करत खाली आली आणि घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत तिने वडील, आईला भावाच्या खोलीत नेले. तिथे प्रतापचा मृतदेह फासावर लटकला होता. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली असताना प्रतापने आत्महत्या का करावी, असा प्रश्न साऱ्यांना पडला. त्याने कोणावर आरोप करणारी चिठ्ठीही लिहिली नव्हती. अनिल हे सगळे पाहून मटकन खाली बसले. त्यांच्या पत्नीची तर शुद्धच हरपली. मेहेर कॉलनी पोलिस ठाण्याच्या दोन हवालदारांनी येऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. हळूहळू सगळे शांत झाले.  प्रतापची पत्नी बाळाला घेऊन माहेरीच राहिली. दीड वर्षानंतर मेहेर कॉलनीच्या पोलिस ठाण्याचा प्रभारी कारभार इन्स्पेक्टर जगदाळेंकडे आला. दुपारची वेळ असल्याने त्यांनी पेंडिंग फाइलचा गठ्ठा चाळणे सुरू केले. अनिल यांच्या मुलाच्या आत्महत्येची फाइल पाहून ते चमकले. त्यांनी हवालदारांना बोलावले. तेव्हा ते म्हणाले, की या प्रकरणाचा तपास करणारे दोघेही सहा महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झालेत. जगदाळेंनी तपासाची चक्रे फिरवली. आणि जे सत्य समोर आले ते पाहून ते स्वतःच चकित झाले. वाचा पुढील भागात