आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलेनगरात गळफास घेऊन कामगाराची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचल्याचा पोलिसांना संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी फुलेनगरात घडली. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार समोर आला. बाबासाहेब पुनाजी भिवसने (३५) असे त्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी माहेरी राहायला गेली होती.

 

दोन मुले आणि मुली असणारे बाबासाहेब सेंट्रिंगचे काम करत होते. काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत असावेत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गुरुवारी रात्री त्यांनी गळफास घेतला. सकाळी शेजारी राहणारा पुतण्या त्यांना झोपेतून उठवण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. उस्मानपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सहायक फौजदार अनिल निकम तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...