आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर: सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची प्रशिक्षण केंद्रात आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर जिल्ह्यातल्या चाकूर येथे असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी सकाळी एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.  


सीमा सुरक्षा दलातील सूत्रांकडून तसेच चाकूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात  पंधरा दिवसांपूर्वी  गुजरातच्या कॅम्पमधून एक बटालियन आले होते. त्यात लिटलरॉय कमलनाथरॉय प्रमाणिक ( २७ , रा. छोटो पिंजाररझार  जि. कुछबिहार, पश्चिम बंगाल) याचाही समावेश होता. सुरक्षा दलाच्या कॅम्प परिसरात रात्री गस्त घालण्याची जबाबदारी लिटलरॉय प्रमाणिक आणि त्याच्यासह आलेल्या जवानांकडे दिली होती. मंगळवारी पहाटे गस्तीवर असलेल्या लिटलरॉय याने अचानक स्वतःकडील बंदुकीतून आपल्या गळ्याजवळ गोळी झाडली. तेथे गस्तीवर असलेल्या इतर जवानांनी लिटलरॉयला सुरक्षा दलाच्या परिसरातील रुग्णालयात नेले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

 

परंतु तेथे या जवानाला मृत घोषित करण्यात आले.  याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली असून या घटनेची त्याच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की त्याच्याकडे कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे या जवानाच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...