आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवाजीनगरमधील अकराव्या योजनेतील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. भगवान धोंडिबा शिरोळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी बारा वाजता घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, घाटीतील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शिरोळे यांचा २०१७ मध्ये अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते वाळूज येथील एका खासगी कंपनीत कार्यरत होते, अशी माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल एस. एन. नरवडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...