आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग शेतमजूर असलेल्या तरुण भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर/ शेगाव : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका ३५ वर्षीय शेतमजूर आणि भाजप कार्यकर्त्याने पुन्हा आणूया आपले सरकार' हे भाजपचे टी शर्ट घालून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शेगाव तालुक्यातील खातखेड येथे रविवारी सकाळी सुमारास घडली. विशेष म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्यात दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रचार सभेपूर्वीच ही घटना घडली. 

राजू ज्ञानदेव तलवारे (३५) असे या शेतमजुराचे नाव आहे. राजेश तलवारे हे दिव्यांग होते. शेतमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. भाजपचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या प्रचारार्थ मागील आठ दिवसांपासून ते सक्रिय होते. परंतु काही दिवसांपासून ते आर्थिक विंवचनेत होते. तलवारेंच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...