आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने शहरातील मित्राच्या खोलीवर आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विठ्ठलनगर भागात हा प्रकार समोर आला. राजेश हनुमान राव बागल (२८, मूळ रा. माजलगाव) असे या तरुणाचे नाव असून तो मंगळवारी रात्रीच मित्राच्या खोलीवर आला होता. राजेशचे वडील गावाकडे शेती करतात. काही दिवसांपासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मंगळवारी रात्री तो मित्राच्या खोलीवर आला. बुधवारी त्याने गळफास घेेल्याचे समोर आले. मुकुंदवाडी ठाण्याचे उपनिरीक्षक संजय बनसोडे यांनी राजेशला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुकुंदवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून हवालदार लक्ष्मण राठाेड तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...