आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनवतखेड येथील एकाची देऊळगावराजात आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा- बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीने शहरालगत असलेल्या खंडोबा डोंगरावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज १७ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. 


बुलडाणा तालुक्यातील शिवदास पांडुरंग पिंपळे वय ३८ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज दुपारी त्याचा मृतदेह खंडोबा डोंगरावरील एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. मृत शिवदास पिंपळे हा विवाहित असून जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ ही त्याची सासुरवाडी आहे. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...