आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या करतोय, तरुणाची पोस्ट; मित्रांनी औरंगाबादेत शोध घेऊन केले मन:परिवर्तन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- एका पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या तरुणाने काही जणांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याबाबत फेसबुकवरून पोस्ट केली. ही पाेस्ट वाचताच पोलिस प्रशासनासह नातेवाइक व मित्रांनी त्याची शोधमोहीम राबवली. काही तासांत पत्नी, मुलीसह तो औरंगाबादेत सापडला. समुपदेशन करून मित्रांनी धीर देत त्याचे मनपरिवर्तन केले.


दत्ता प्रभाळे (रा. उमरद खालसा) असे या तरुणाचे नाव आहे. ताे शेकापचा कार्यकर्ता आहे. दरम्यान, रविवारी सकाळी त्याने काही जणांकडून होत असलेल्या त्रासामुळे फेसबुकवरून पोस्ट लिहून संबंधितांची नावे चिठ्ठीत लिहून मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. काही क्षणातच त्याच्या मित्रांनी ही पोस्ट वाचून त्याच्याशी संपर्क केला. नंतर पोलिस प्रशासन तसेच नातेवाइकांनाही माहिती दिली गेली. यामुळे एकाच वेळी पोलिस, नातेवाइक आणि मित्रांनी प्रभाळे याचा शोध घेतला. अखेर तो औरंगाबादेत असल्याचे कळल्यानंतर त्याच्याशी संपर्क केला. बीडच्या काही जणांनी त्यांच्या औरंगाबादेतील मित्रांच्या मदतीने त्याचे ठिकाण शोधले आणि त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याने पुन्हा फेसबुकवरूनच आपण नैराश्याच्या भरात चुकीची पोस्ट केली आणि आता विचार बदलल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...