आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या ५ तासांपेक्षा जास्त वापराने आत्महत्येचा धाेका दुप्पट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका व ब्रिटनमध्ये झालेल्या चार माेठ्या अभ्यासांतून दरराेेज डिजिटल मीडियावर अर्ध्या तासापासून ते दोन तासांपर्यंत वेळ घालवण्याने आनंद मिळण्यासह मानसिक आराेग्य चांगले राहत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. मात्र, यापेक्षा जास्त वेळ घालवल्यास धाेक्याची स्थिती निर्माण हाेते. बहुतांश वेळ ऑनलाइन राहिल्यास घातक परिणाम समाेर येऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा जास्त प्रमाणात वापर करणारे दु:खी व निराश असतात.

 

या अभ्यासांत सांगितलेल्या मुद्द्यांमुळे निष्कर्षांत काही टक्के फरक येण्याचे संकेत आहेत. यातून एखादा  मुद्दा व परिणामाचा संबंध कमी होताे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराने आत्महत्येच्या प्रयत्नांत केवळ ०.५ ते २ % फरक दिसून आला; परंतु ५ किंवा त्यापेक्षा जासत तास अशा उपकरणांचा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे आत्महत्या करण्याचे प्रयत्न एक तास वापरणाऱ्यांच्या तुलनेत दुप्पट दिसून आले. अशा मुलांवर प्रभाव पडण्याच्या वाढत्या पुराव्यांवर प्रकाशात तंत्रज्ञानाचा वापर व आनंदी राहण्यातील संबंधाचे महत्त‌्व वाढले आहे. 

 

अमेरिकेत   २००९ ते २०१७ दरम्यान १४ ते १७ वर्षांच्या मुलांत नैराश्याचे प्रमाण ६० % वाढले. वयाेगटात स्वत:चे नुकसान व आत्महत्या करण्याचे विचार आल्यावर रुग्णालयात दाखल हाेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.  यात अल्पवयीन मुलींच्या आत्महत्येचे प्रमाण ४० वर्षांत सर्वाधिक आहे. या ट्रेंडमागील कारणे ठरवणे आव्हानात्मक आहे. तरीदेखील जास्त प्रमाणातील टीनएजर्सच्या दैनंदिन जीवनावर स्मार्टफोन व डिजिटल मीडियाने जितका जास्त प्रभाव टाकला, तितका कुणीही टाकलेला नाही. त्यामुळे  इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मर्यादित प्रमाणात वापर करण्यात काेणतेही नुकसान नाही. 
 

अशा उपकरणांच्या जास्त वापरापासून बचावासाठी काही सर्वसामान्य उपाय केले जाऊ शकतात. जसे...

>> रात्री बेडरूममध्ये फोन वा टॅब्लेट ठेवू नये. फोनचा वापर अलार्म क्लॉक म्हणून करत असाल तर घड्याळ खरेदी करा. तसेच टॅब्लेट वापरत असाल तर सर्व नोटिफिकेशन बंद करा.

 

>> मनोरंजनासाठी राेज उपकरणांचा वापर दाेन तास कमी करा. तसेच हाेमवर्क व उपकरणांशी निगडित इतर कामे मात्र या वापरातून अवश्य वगळा.

 

>> झाेपेच्या एक तासापूर्वी  उपकरणांचा वापर करू नका. त्याचा मनावरही अयाेग्य प्रभाव पडताे. त्यांच्या निळ्या प्रकाशाने झाेप बिघडते व पुरेशी झाेप न झाल्यने नैराश्याचा धाेका वाढताे.

बातम्या आणखी आहेत...