आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकरांचे सुपूत्र सुजात आंबेडकर यांच्या गाडीला अपघात, किरकोळ दुखापत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना सुजात सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात सुजात यांना किरकोळ दुखापत झालीये. याबाबत सुजात यांनी व्हिडिओ पोस्ट करुन आपण सुखरुप असल्याचे सांगितले आहे.

 

फेसबूक पोस्टद्वारे सुखरुप असल्याचे स्पष्ट केले
 
"मी सुजात आंबेडकर. सोमवारी रात्री माझा छोटासा अपघात झाला होता. मी आता ठीक आहे. 15 ऑक्टोबरचा नांदेड येथील माझा नियोजित दौरा मी करणार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जमतील तितके दौरे करेन. पण शक्य झालं नाही, तर माफ करा आणि वंचितचं काम सुरु ठेवा." असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले.
 

बातम्या आणखी आहेत...