आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sujata Kumar Dies Battling Cancer: Sujata Funeral Done By Her Yougher Sister Suchitra Krishnamurthy

श्रीदेवीची को-स्टार सुजातावर अंत्यसंस्कार, लहान बहिणीने दिला मुखाग्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटात श्रीदेवीच्या बहिणीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुजाता कुमार (53) यांचे निधन झाले आहे. 12 वर्षांपासून त्या कँसरचा सामना करत होत्या. रविवारी रात्रई जवळपास 11.29 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांची लहान बहीण सुचित्रा कृष्णमुर्ती  यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी सुचित्राची मुलगी कावेरीसोबत कुटूंबातील सदस्य अंत्यसंस्कारास पोहोचले. परंतू येथे कुणीही बॉलिवूड सेलेब दिसले नाहीत. 


सुजाता यांच्या शरीराच्या अनेक भागांनी काम करणे केले होते बंद 
- सुजाता यांना चौथ्या स्टेजचा कँसर होता. त्यांच्या शरीराच्या अनेक अंगांनी काम करणे बंद केले होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना हाय स्टेजचा कँसर होता. 
- बहिण सुचित्राने सोशल मीडियावर निधनाचे वृत्त दिले. त्यांनी लिहिले, "आपली प्रेमळ सुजाता आता या जगात नाही. ती आपल्याला ऐकटे सोडून निघून गेली. काही तासांपुर्वी 19 ऑगस्ट 2018 ला रात्री 11.26 वाजता ती आपल्याला सोडून गेली. आयुष्य आता पहिल्यासारखे राहू शकत नाही."

 

बॉलिवूड सेलेब्सने दिली श्रध्दांजली 
- सोनम कपूरने सोशल मीडियावर सुजाताला श्रध्दांजली दिली. तिने लिहिले "सुजाता मॅम तुमच्या आत्म्याला शांती मिळो, तुमच्या कुटूंबाला माझे प्रेम आणि सन्मान"
- बोनी कपूर यांनी एका एन्टटेन्मेंट साइटसोबत बोलताना सांगतिले की, "सुजात जेव्हा श्रीदेवीसोबत काम करत होत्या, तेव्हा माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यांना एक-दोन वेळा भेटलो, श्रीदेवी सुजाताविषयी म्हणायच्या की, त्या खुप चांगल्या व्यक्ती होत्या. तसेच खुप स्वाभिमानी महिला आहेत."
- दिव्या दत्ताने लिहिले, "मला माफ करा की, मी ही न्यूज ऐकली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. तुम्ही खुप लव्हली होत्या. तुम्ही एका सोमध्ये माझ्या सासूची भूमिका साकारली होती. तुमच्या आठवणी या माझ्यासाठी खुप जवळच्या आहेत."

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...