आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या ऑनस्क्रीन बहिणीचे निधन, वयाच्या 53 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवींचा कमबॅक चित्रपट 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये त्यांच्या बहिणीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचे निधन झाले आहे. त्या 53 वर्षांच्या होत्या. रविवारी रात्री जवळपास 11.29 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुजाता यांना चौथ्या स्टेजचा कँसर झाला होता. यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अंगांनी काम करणे बंद केले होते. सुजाता यांना कोणता कँसर होता याची माहिती मिळू शकलेली नाही. बहीण सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, "आपली सुजाता आता या जगात नाही. ती आपल्याला एकटे सोडून निघून गेली. काही तासांपुर्वी 19 ऑगस्ट रोजी रात्री 11.26 वाजता तिने जगाचा निरोप घेतला. आयुष्य आता पहिल्या सारखे राहू शकणार नाही." 

 

टीव्ही सीरियल्समध्ये केले होते काम 
'इंग्लिश विंग्लिश'सोबतच सुजाताने 'रांझणा' आणि 'गोरी तेरे प्यार में' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी अनिल कपूर स्टारर '24' मध्येही काम केले होते. यासोबतच त्या 'होटल किंग्स्टन' आणि 'बॉम्बे टॉकिंग' सारख्या शोमध्ये दिसल्या होत्या. एका मुलाखती दरम्यान सुजाता यांनी सांगितले होते की, जोपर्यंत गौरी शिंदेने 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटात मला अप्रोच केले नाही, तोपर्यंत माझ्याजवळ कोणताही चांगला रोल नव्हता. 

 

बातम्या आणखी आहेत...