आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिटासाठी विखेंचे पुत्र सुजय जाणार भाजपमध्ये, खासदार दिलीप गांधींचा पत्ता कट होण्याची चिन्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डाॅ. सुजय मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अहमदनगर लाेकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी साेडण्यास नकार दिल्यामुळे अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करून डाॅ. सुजय यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. ही जागा जागावाटपात राष्ट्रवादीकडे आहे. डाॅ. सुजयसाठी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला द्यावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र यात यश न आल्याने डाॅ. सुजय यांनी भाजपचा रस्ता निवडला. 


विधानसभेला वडीलही भाजपत?
डाॅ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी वडील राधाकृष्ण विखे व माताेश्री तथा जि.प. अध्यक्षा  शालिनी विखे तूर्त काँग्रेसमध्येच राहतील. मात्र विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर १२ आमदारांसह राधाकृष्ण विखे पाटील भाजपत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. 


खासदार संजय काकडे काँग्रेसमध्ये
राज्यसभेतील भाजप खासदार संजय काकडे यांनी रविवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली. कार्यकर्त्यांकडून कायम दुय्यम वागणूक  व सतत दुजाभाव केल्यामुळे आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी रविवारी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...