आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sujoy Ghosh Vidya Balan Are Not Has Any Controversy Between Them, Will Work Together For 'Story 3'

सुजॉय घोष - विद्या बालन यांच्यामध्ये नाहीत काेणतेही वाद, 'कहानी 3' साठी मिळून करणार काम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गेल्या काही दिवसांपासून निर्माते सुजॉय घोष आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्यात वितुष्ट असल्याची चर्चा इंडस्ट्रीत होती. दोघांच्या नात्यात कटुता आली त्यामुळे ते दोघेही आपल्या हिट फ्रँचायझी 'कहानी' चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम करणार नाहीत, असे बोलले जात होते. मात्र, बदला चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुजॉयने याला अफवा सांगितले होते. आता विद्यानेदेखील आमचे नाते पूर्वीप्रमाणेच आहे, असे सांगितले आहे. आम्ही लवकरच कहानी ३वर काम सुरू करणार असल्याचेही तिने सांगितले. 
 
विद्या म्हणाली, 'सुजॉय दर अाठवड्याला मला विचारतात कसे लिहू, काय लिहू ॽ मी त्यांना सांगते, तुम्ही कहानी लिहिणे सुरू करा. हा एका फ्रँचायझीचा भाग आहे, मागील कथा पाहून पुढची कथा लिहायची आहे, सर्व डोक्यातून काढून टाका आणि नवी कहानी लिहा. सध्या तर ते अनेक प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहेत. नुकताच त्यांनी एक प्रोजेक्ट 'टाइपरायटर' केला. याव्यतिरिक्त ते दुसरेही खूप काही करत आहेत. मी एक अभिनेत्री आहे, मी काही कथा लिहू शकत नाही. मात्र, कहानी ३ बनणार असेल तर मी नक्कीच त्याचा भाग होईन. 
 

दोन तासांचा चित्रपट नव्हे, इंदिराजींची कथा सविस्तर दाखवायला हवी.. 
विद्या लवकरच इंदिरा गांधींवर आधारित वेब शोमध्ये दिसणार आहे. याविषयी ती म्हणाली..., इंदिराजी यांचे जीवन दोन तासांत दाखवणे खूपच अवघड होते. त्यामुळे मी आणि रोनी स्क्रूवाला यांनी निर्णय घेतला की, त्यांची सविस्तर कथा आम्ही वेब शोच्या माध्यमातून दाखवणार आहोत. अशा प्रकारच्या कथांसाठी चित्रपटात तडजोड करावी लागते. 
 

सेटवर अक्षयसोबत मस्करी करण्याची सवय झाली...  
'मिशन मंगल'मध्ये मी आणि अक्षयने १२ वर्षांनंतर काम केले. इतक्या वर्षांत आमच्या दोघांनाही संधी मिळाली नाही. आधी मी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इतकी मस्करी करत नव्हते, मात्र हे बेबीच्या दरम्यान अक्षयसोबत इतकी गंमत करायला शिकले की, आता तर सवय झाली आहे. अक्षय सेटवर सर्वांसोबत गंमत करत असतो. कधी तो माझ्या साडीच्या पदराला चमचा बांधायचा, तर कधी कुणाचे घड्याळ लपवून ठेवायचा, तर कधी कुणाचा फोन लपवायचा, हे त्याचे प्रत्येक ठिकाणी सुरू असते. तो हसत खेळत काम करतो. 

बातम्या आणखी आहेत...