आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिरो ते हीरो: खर्च भागवण्यासाठी कधी काळी बसमध्ये पेन विकायचे, डॉक्टर बनण्याचे स्वप्न सोडुन छोट्या दुकानात काम करून उभी केली कोट्यांची कंपनी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुग्राम- शाहरुख खानचा सिनेमा झिरो रिलीज झाला आहे, त्यात मेरठच्या एका बुटक्या व्यक्तीची गोष्ट दाखवली आहे. आजा आम्ही तुम्हाल अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी झिरोपासून सुरूवात करून यशाचे शिखर गाठले. ही गोष्ट आहे गुरुग्रामच्या कुंवर सचदेव ची...


छोट्या दुकानातुन केली सुरूवात

- इन्वर्टर बनवणारी कंपनी सु-कॅम पॉवर सिस्टीम लिमिटेड कंपनी एका छोट्या दुकानातुन सुरू झाली होती. आज याचे इन्वर्टर, यूपीएस आणि सोलर सिस्टीम  70 पेक्षा जास्त देशात विकल्या जातात. 
- या कंपनीचे ओनर कुंवर सचदेव आहेत, त्यांना सोलार मॅन ऑफ इंडिया म्हणले जाते.
- कुंवरने एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, सुकॅम शब्दचा काहीच अर्थ नाहीये. हे नाव मी 31 वर्षांपूर्वी पेनाच्या व्यवसायासाठी ठेवणार होतो. 


लहानपणी भावासोबत विकले पेन

- कुंवर लहानपणी आपल्या मोठ्या भावासोबत गल्ली-गल्लीत जाउन सायकलवर पेन विकायचे. 
- स्टॅटिस्टिक्समध्ये ऑनर्सनंतर त्यांनी सगळा वेळ भावासोबत पेन विकण्यास दिला. 
- काही काळानंतर पेन विकणे सोडुन दिल्ली युनिव्हर्सीटीमध्ये लॉचे शिक्षण घेतले.


टीव्ही केबलचे केले काम
- ग्रॅजुएशननंतर कुंवर यांनी केबल टीव्ही कंपनीमध्ये मार्केटिंगचेदेखील काम केले.
- 2 वर्षांनंतर नोकरीतुन कमवलेल्या पैशाने स्वत:चा केबन टीव्हीचा व्यवसाय सुरू केला, त्याला सुकॅम नाव दिले. 
- 1991 मध्ये ग्लोबलाइझएशननंतर केबलचा व्यवसाय खुप चालला.


या अपघाताने बदलेले आयुष्य
- साल 2000 मध्ये कुंवरच्या इन्वर्टरने एका लहान मुलाला करंट लागल्याची घटना घडली.
- या घटनेमुळे त्यांना खुप वाईट वाटले आणि त्यानंतर त्यांनी प्लासिटीक बॉडीवाले इन्वर्टर बनवणे सुरू केले.


डॉक्टर बनण्याचे होते स्वप्न
- कुंवर सचदेव यांचे वडील रेल्वेमध्ये सेक्शन ऑफिसर होते आणि त्यांच्या पगारात घर भागने अवघड होते.
- सचदेव 5 वीत असाताना त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रायवेट शाळेतुन काढुन सरकारी शाळेत टाकले. 
- 12वी नंतर त्यांनी मेडिकलची एंट्रेस एग्झाम दिली, पण त्यात त्यांना चांगले नंबर आले नाही त्यामुळे मेडिकलला अॅडमीशन घेण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. 


पुस्तक वाचने आणि पियानो वाजवण्यात आहे इंट्रेस्ट

- कुंवर यांना पुस्कत वाचणे, पियानो वाजवणे, स्विमींग, योगा आणि मॅरोथॉनमध्ये पळण्याची आवड आहे.
- सचदेवयांच्या मोठ्या मुलाने लंडन येथुन शिक्षण पूर्ण केले आहे. ते सुकॅममध्ये सेल्स, मार्केटिंग आणि सर्विसेसचे काम पाहतात. 
- त्यांचा दुसरा मुलगा शौर्यने ILNB प्रोडक्शन्स नावाची कंपनी सुरू केली आहे.