आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रदान मोदी मुलींना देत आहेत सुकन्या अकाउंटमध्ये 10 हजार रुपये, जाणून घ्या सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आवडत्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये काही मोठे बदल केले आहेत. त्यानंतर एक मॅसेज व्हाट्सअप आणि सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत पंतप्रधान मोदी प्रत्येक 1 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना 10 हजार रुपये देत आहेत. येथे जाणून घ्या, या व्हायरल मॅसेजमध्ये किती सत्य आणि असत्यपणा आहे.


मागितली जाते तुमची माहिती 
आजकाल व्हाट्सअपवर भरपूर फॉरवर्ड होत असलेल्या या मेसेजमध्ये सुरुवातील पैसे देणार असल्याचे सांगितले जाते आणि त्यानंतर मॅसेजमध्ये खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. लिंकवर क्लिक करताच एक विंडो ओपन होते. यामध्ये पंतप्रधान सुकन्या योजना लिहिलेले असते आणि सोबतच एक फॉर्मही उघडतो. याठिकाणी मुलीचे नाव, वय आणि राज्य लिहावे लागते. या सर्व डिटेल्सवर एंटर करताच तुमच्यासमोर एक मॅसेज येतो. तुमची एंट्री सक्सेस झाली आहे. व्हेरीफिकेशनसाठी तुम्हाला 10 ग्रुप किंवा मित्रांना हा मॅसेज व्हाट्सअपवर शेअर करावा लागेल.


व्हायरल होत असलेला मॅसेज
तुम्हीही हा मॅसेज वाचून फॉरवर्ड करत असाल तर जाणून घ्या, हा मॅसेज पूर्णपणे फेक आहे. या मॅसेजमध्ये देण्यात आलेल्या वेबसाइटची लिंक खोटी आहे. http://sukanya.online-yojna-registration.in/ ही लिंक कोणत्याही प्रकारे सरकारशी संबंधित नाही. मॅसेजमध्ये 10 हजार रुपये सरकार देणार असल्याचा करण्यात आलेला दावा खोटा आहे. सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्याची सुरक्षा यासाठी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 8.5 टक्के व्याज मिळेल. या व्यतिरिक्त सरकारकडून पैसे देणार असल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.


येथून घ्यावी सुकन्या समृद्धी योजनेची माहिती 
तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेची माहिती https://www.india.gov.in/sukanya-samriddhi-yojna या लिंकवर मिळू शकते. या व्यतिरिक्त इतर सरकारी वेबसाईट्सवरही ही माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम आणि अटी आहेत. त्या नियम आणि अटींची पूर्तता केल्यानंतरच लाभ प्राप्त होऊ शकतो. फेक लिंकवर क्लिक करून आपली माहिती कोणालाही देऊ नये. तुमच्या माहितीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...