आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफ स्क्रीन धम्माल करत आहेत 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेतील कलाकार!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई 9 जानेवारी : कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे... या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ही जोडी प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडत आहे. इतकेच नसून या मालिकेमधून शर्मिष्ठा आणि शशांक केतकर देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांना या दोघांमधील बहीण भावाच नातं देखील खूप आवडत आहे, प्रेक्षकांची त्यालादेखील पसंती मिळत आहे. सिड आणि संयु यांच्यामधील छोटी मोठी भांडण, सिडचे संयुला समजवणे, त्यांच्या धम्माल मस्ती कुठेतरी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. पडद्यावरच नसून पडद्यामागे देखील यांची बरीच धम्माल मस्ती सुरु असते. मालिकेद्वारे चोवीस तासातला बराचसा वेळ एकत्र रहाता आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखू लागता. आणि त्यातून काही सुंदर नाती तयार होतात जी आयुष्यभर तशीच रहातात. सध्या मालिकांमध्ये लग्नसराइचे दिवस आहे. सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये देखील संयु आणि मिलिंद यांचे लग्न होणार असून याच दरम्यान मालिकेतील कलाकारांनी हे शूट सुरु असताना बरीच धम्माल मस्ती केली आहे. जे या फोटोज वरून समजते. शर्मिष्ठा राउत लग्नाच्या भागासाठी खूप सुंदर तयार झाली आहे पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, खोपा, नथ, मेखला तिने घातला आहे. तसेच अनु म्हणजेच मृणाल दुसानीस देखील तिच्या भुमिकेहून जरा वेगळीच दिसत आहे कारण तिने देखील शर्मिष्ठा सोबत मस्त गोगल घालून फोटो काढला आहे. सिध्दार्थ, अनु आणि संयु यांचा बाईक वरील फोटो देखील खूपच सुंदर प्रकारे कॅमेरा मध्ये टिपला गेला आहे. या तिघांचे पडद्यामागील नातं किती सुंदर आहे आणि ते किती धम्माल मस्ती करतात हे समजतं.  

बातम्या आणखी आहेत...