आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला मोठा धक्का, शिरोमणी अकाली दल स्वतंत्र लढणार, सुखबीर बादल यांची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरुक्षेत्र - 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणींमध्ये एकापाठोपाठ वाढ होत असल्याचे चित्र आहे. भाजपला आता आणखी एक झटका लागला आहे. त्यामुळे त्यांचा आणखी एक जवळचा मित्रपक्ष दुरावल्याची चर्चा आहे. शिरोमणी अकाली दल पक्षाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली आहे. अकाली दल पक्षाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी ही घोषणा केली. 


पिपली नगर येथील धान्य बाजारातील सभेत बोलताना बादल म्हणाले की, आम्ही पंजाबच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. आता आम्ही हरियाणामध्ये विकासाची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहोत. यावेळी त्यांनी पंजागी समाजाला  हरियाणामध्ये विकासासाठी सहकार्य करण्याची विनंतीही केली. यावेळी बादल यांनी निवडणुकीचा विचार करता अनेक आश्वासनेगी दिली. 


भाजप आणि अकाली दल गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्रपक्ष आहेत. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत एकत्रित निवडणिुका लढवल्या आहेत. गेल्यावेळीही हरियाणा विधानसभेत दोन्ही पक्ष एकत्रिक लढले होते, पण त्यांचा पराभव झाला. पण बादल यांच्या या घोषणेने भाजपला मात्र जबर धक्का बसला आहे. 

बातम्या आणखी आहेत...