आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळा सुसह्य होण्यासाठी या काही टिप्स... 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीचे दिवस संपून आता उन्हाळा सुरू झाला आहे. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घरच्या घरी स्वत:ची प्रकृती कशी सांभाळाल याबाबत काही टिप्स...

 
- सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे 2-2 थेंब नाकात घालावेत. याला नस्य असं म्हणतात. यामुळे डोकं आणि डोळ्यांतील उष्णता शमते. 
- खमंग, कोरडं, शिळं, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसंच आमचूर, लोणचं, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट पदार्थ खाणं टाळावं. 


- कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद ज्यूस यांचे सेवन टाळावं. या पदार्थांमुळे पचनशक्ती बिघडते. शिवाय त्याच्या अतिसेवनामुळे त्वचारोग होतात. 
- कैरीचं पन्हं, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत, शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचं रक्षण होण्यास मदत होते. 


- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान खूप लागत असल्याने पुरेसं पाणी प्यावं. 
- या दिवसांत सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची चप्पल वापरू नयेत. 


- कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावं. डोकं आणि डोळ्यांचं उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा. 
उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १०-१५ मिनिटांनंतरच पाणी प्यावं. 


- या दिवसांत फ्रिज किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो; म्हणून साधं अथवा माठातील पाणी प्यावं. 
- वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या तयार कराव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे दररोज करावं. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. 


- अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणं आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात. 
- जळवात (पायांना भेगा पडणे) आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेंदी लावावी. 

बातम्या आणखी आहेत...