आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात अशी राखा केसांची निगा! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात ऊन वाढतं तसा त्याचा परिणाम शरीरावरही पडतो. विशेषतः केसांची तर उन्हाळ्यात फार काळजी घेतली पाहिजे. कारण धूळ, माती व घामामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. परिणामी केसात कोंडा आणि डोक्यावरील त्वचा रुक्ष होते. पण खाली दिलेल्या काही टिप्सचा वापर केलात तर या काळातही तुम्ही केसांची निगा राखू शकता. 


- केसांना धूळ-माती आणि उन्हापासून वाचवण्यासाठी घराबाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा. 
- आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा केस धुणे गरजेचे आहे. तुमचे केस तेलकट असतील तर प्रत्येक दुसऱ्या दिवशी केस धुतले तरी चालतील. 


- केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून २० मिनिटापर्यंत ठेवावे. मग गार पाण्याने केस धुऊन टाकावेत. कोंडा काढण्याचा हा सर्वांत उत्तम उपाय आहे. 
- केसांना आवळा लावल्यानेसुद्धा केस चांगले राहतात. 


- केसांवर सारखे कंगवा फिरवायला हवा. त्यामुळे केसांमधील धूळ, माती निघून जाईल. 
- केसांना हर्बल ऑइलने मसाज केल्यास उत्तम. 


- शँपूचा जास्त वापर केल्यास केस कोरडे होतात. म्हणून चांगल्या कंपनीच्या शँपूचा वापर करावा. 
- मेंदीत लिंबाचा रस आणि एक अंडं फेटून पॅक तयार करून केसांना लावा. त्यामुळे केसांची चमक तर वाढतेच आणि गरमीत आरामही मिळतो. 
- केसांना जास्त गरम किंवा थंड पाण्याने धुऊ नये. केसांना धुतल्यानंतर कंडिशनर लावावा.

बातम्या आणखी आहेत...