Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | summer vacation kokan railway rush

सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे हाऊसफुल्ल

Agency | Update - May 20, 2011, 04:01 PM IST

सुट्ट्यांमध्ये कोकणात येणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ झाल्याने कोकण रेल्वे हाऊसफुल्ल झाली आहे.

  • summer vacation kokan railway rush

    रत्नागिरी - उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात येणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ झाल्याने कोकण रेल्वे हाऊसफुल्ल झाली आहे. मुंबईहून कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.

    गर्दीमुळे आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी वाढत असून, प्रवाशांना त्रास होत आहे. याबाबत तक्रार करण्यात आली असली तरी प्रवाशांच्या गर्दीपुढे रेल्वे कर्मचारीही हतबल झाले आहेत. सिंधुदुर्गात जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, दिवा पॅसेंजर, दादर-सावंतवाडी या गाड्यांमध्ये पाय ठेवण्यासही प्रवाशांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. मुंबईहूनच गाड्या भरून येत असल्याने पुढील प्रवाशांचे हाल होत आहेत.

    वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता कोकणकन्या एक्‍सप्रेसच्या धर्तीवर सावंतवाडी-दादर, जनशताब्दी, मुंबई-मेंगलोर आदी गाड्यांतील डब्यांची संख्या वीसपर्यंत वाढविण्याची प्रवाशांची मागणी आहे.Trending