आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द कपिल शर्मा शो'व्यतिरिक्त सुमोना चक्रवर्तीकडे नाही पुरेसे काम, म्हणाली - लोक माझी उपस्थितीही विसरले आहेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क. 'द कपिल शर्मा शो'मध्ये भुरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती म्हणाली की, या शो शिवाय तिच्याकडे पुरेसे काम नाही. तिला ज्या प्रकारचे काम हवे आहे ते तिला सापडत नाही. तिने हे वक्तव्य एका बातचीतमध्ये केले. या दरम्यान, सुमोनाने कबूल केले की, ती सध्या तिच्या पीआर स्किल्सवर काम करीत आहे आणि लोकांकडे काम मागत आहे.

  • लोक माझी उपस्थितीसुद्धा विसरले आहेत: सुमोना

सुमोना म्हणाली, "मी फारशी कुणाला भेट नाही किंवा पार्टीतही जात नाही. शूटिंग नंतर घरी जाते किंवा मित्रांसमवेत वेळ घालवतो. बरेच लोक माझी उपस्थिती विसरले आहेत. पण आता मला वाटते की, जर आपल्याला अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द चालू ठेवायची असेल तर आपली उपस्थिती टिकवून ठेवणे फार महत्वाचे आहे."

  • 'लोकांमध्ये माझ्याबद्दल गैरसमज आहेत'

31 वर्षाच्या सुमोनाने सांगितल्यानुसार, तिच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहेत, ज्यामुळे तिला चिंता लागली आहे. ती म्हणाली, "लोकांना वाटते की मी विक्षिप्त आहे आणि अधिक मोबदल्याची मागणी करते. पण हे खरे नाही. मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की, मी अभिनेत्री म्हणून तेच मागते, ज्यासाठी मी पात्र आहे.चांगल्या प्रोजेक्टसाठी वाटाघाटी करते. माझे पीआर स्किल्स  त्या पातळीचे नाहीत. मला हे उशीरा कळले. आता मी अधिक चांगला दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांना भेटतेय, इतकेच नाही तर त्यांना कॉल आणि मेसेज करुन काम मागत आहे."

  • काम मागण्याची लाज नाही

कामाची मागणी करण्यात कोणतीही लाज वाटत नाही, असे सुमोना म्हणाली. आत्तापर्यंत कामाच्या बळावर स्वतःला सिद्ध करण्यावर तिचा विश्वास होता.  परंतु वास्तविकता ही आहे की, केवळ कठोर परिश्रम सर्वकाही नसतात.

  • सुमोनाला कोणत्या प्रकारच्या भूमिका हव्या आहेत?

सुमोनाला जेव्हा विचारले गेले की तिला कोणत्या प्रकारचे पात्र साधायचे आहे, तेव्हा ती म्हणाली, "नायक-नायिकाचे दिवस गेले आहेत, आता लक्ष्य कथा आणि कलाकारांवर केंद्रित आहे. अर्थात जर मला मुख्य भूमिका मिळाली तर मी करते. पण कथानकाच्या अनुषंगाने मला चांगल्या भूमिका मिळाल्या तर मला त्या करायला आवडतात. कथेत एखादे पात्र काढून टाकले तरी ती पुढे सरकते. त्याचे महत्त्व गरजेचे आहे." सुमोनाने सांगितल्यानुसार, तिला सायको किंवा पोलिस / इंटेलिजेंस ऑफिसरसारखे पात्र साकारायचे आहे. तिचे मते या भूमिकांमध्ये एक आकर्षण आहे.

बातम्या आणखी आहेत...